कोटक महिंद्रा बँकेचे Kotak 811 जीरो बॅलन्स अकाऊंट हे एक डिजिटल सुविधा-युक्त बचत खाते आहे, जे तुम्ही पूर्णपणे ऑनलाइन पद्धतीने काही मिनिटांत उघडू शकता. या खात्यामध्ये किमान शिल्लक रक्कम ठेवण्याची गरज नसते आणि यामध्ये डेबिट कार्ड, UPI, मोबाइल बँकिंग सारख्या सर्व आधुनिक सुविधा उपलब्ध आहेत. या ब्लॉग मध्ये, आम्ही तुम्हाला कोटक 811 खाते उघडण्याची पूर्ण प्रक्रिया सोप्या मराठी भाषेत समजवू, ज्यामुळे तुम्ही हे खाते सहजपणे उघडू शकाल.
कोटक 811 खात्याची वैशिष्ट्ये
- शून्य शिल्लक: कोणत्याही प्रकारची किमान शिल्लक रक्कम ठेवण्याची गरज नाही.
- ऑनलाइन प्रक्रिया: घरबसल्या 10 मिनिटांत खाते उघडा.
- व्हर्च्युअल डेबिट कार्ड: ऑनलाइन शॉपिंगसाठी तात्पुरते डेबिट कार्ड मिळते.
- UPI आणि मोबाइल बँकिंग: त्वरित पैसे हस्तांतरण आणि बिल भरांनी.
- व्याज: बचत खात्याप्रमाणे शिल्लक रकमेवर व्याज मिळते.
कोटक 811 खाते उघडण्यासाठी पात्रता
- वय 18 वर्षांपेक्षा जास्त असलेले भारतीय नागरिक.
- आधार कार्ड, पॅन कार्ड, आणि मोबाइल नंबर (आधारशी लिंक केलेला) असणे आवश्यक.
- स्वतःचा ऍक्टिव्ह ईमेल आयडी.
आवश्यक कागदपत्रे
- आधार कार्ड (ऑरिजिनल आणि स्वतःच्या हस्ताक्षराची प्रत).
- पॅन कार्ड.
- फोटो (पासपोर्ट सायज).
- मोबाइल नंबर (आधारशी लिंक केलेला).
कोटक 811 खाते उघडण्याची प्रक्रिया
1: कोटक 811 online फॉर्म भरणे.
- कोटक बँकेच्या अधिकृत वेबसाइटवर Kotak 811 अकाऊंट पेज विजिट करा.
- “Apply Now” बटनवर क्लिक करून तुमचा मोबाइल नंबर आणि ईमेल आयडी आणि आपला पिनकोड टाका.

सर्व माहिती भरल्या नंतर Open Account या ऑप्शन वर क्लिक करा.

तुमच्या mail वर आणि mobile नंबर वर एक OTP येईल तो येथे भरा.
2: आधार माहिती
- आधार कार्ड नंबर आणि pan card नंबर टाका

- आणि OTP व्हेरिफिकेशन पूर्ण करा.
3: वयक्तिक माहिती भरा.
- वैयक्तिक माहिती (जन्मतारीख, पत्ता) आपला व्यवसाय आईचे नाव भरा आणि proceed येथे क्लिक करा.

सर्व माहिती भरल्या नंतर आपला पत्ता एक वेळेस पहा, जर तूम्ही दुसऱ्या पत्त्यावर राहत आसल तर दुसरा पत्ता भरा आणि proceed येथे क्लिक करा.

4: नॉमिनी माहिती
- जर तुम्हाला तुमच्या खात्या मध्ये वारसदार जोडायचा असेल तर तुम्ही जोडू शकता.

वारसदार जोडल्या नंतर proceed येथे क्लिक करा.
5: kotak 811 अटी
नंतर तुमच्या समोर अशी माहिती दिसेल हि माहिती kotak बँक च्या term and conditions आहेत हे काळजीपूर्वक वाचून सर्व conditions ला right टिक करून proceed येथे क्लिक करा.

6: खाते प्रकार .

तुमच्या समोर आसा इंटरफेस दिसेल, त्याच्या जवळच तुम्हाला आस इंटरफेस दिसेल तो खाता type select करा
👇

खाते select केल्या नंतर proceed येथे क्लिक करा.
7: security deposit करा

रु1000 भरा, हे १०००रु तुमच्या खात्या मध्ये जमा होतील आणि ते पैसे तुम्ही खाता चालू झाल्या नंतर कधी हि काढून घेऊ शकता, तुमचे खाते हे झेरो balance खाते आहे.
8: MPIN सेटअप

येथे तुम्ही तुमच्या आवडीचा 6 अंकी पिन ठेवा आणि तो तुमच्या प्रत्येक वेळी लॉगिन साठी लागेल, परत re-enter pin करा आणि परत तोच pin टाका आणि proceed येथे क्लिक करा.
9:Kotak 811 खाते माहिती

आता तुमचे kotak बँक चे खाते ओपेन झाले आहे, तुम्हाला तुमच्या mail id वर आणि sms मध्ये तुमच्या खात्यची सर्व माहिती प्राप्त होईल, आता आपली शेटची स्टेप राहिली आहे complete KYC येथे क्लिक करा

येथे तुम्हाला २ ओप्शंस दिसतील १.Start Video KYC २.Book Appoinment तुम्ही तुमच्या सोयी प्रमाणे २ पैकी कोणते हि १ select करू शकता video kyc ने प्रोसेस केली tr तुमचे खाते लगेच पूर्णपणे चालू होईल, आणि जर तुम्ही Book Appoinment हा पर्याय निवडला तर खाता चालू होण्यासाठी थोडा वेळ लागू शकतो.
- सर्व कागदपत्रे पूर्ण झाल्यानंतर, 24 तासांत तुमचे खाते सक्रिय होईल.
- व्हर्च्युअल डेबिट कार्ड आणि खाते तपशील SMS/ईमेलद्वारे मिळतील.
Kotak 811 खात्याचे फायदे
- विनामूल्य डेबिट कार्ड: ऑनलाइन ट्रान्झॅक्शनसाठी तात्पुरते कार्ड मिळते.
- ऑनलाइन सुविधा: NEFT, IMPS, UPI सारख्या सुविधा उपलब्ध.
- व्याज दर: सध्या 3.5% प्रतिवर्ष व्याज मिळते.
वारंवार विचारले जाणारे प्रश्न
कोटक 811 खात्यासाठी शुल्क किती आहे?
फिजिकल डेबिट कार्ड कसे मिळेल?
खाते उघडताना किती गुंतवणूक करावी लागते का?
Kotak 811
हा ब्लॉग वाचल्यानंतर, तुम्ही Kotak 811 खाते उघडण्याची प्रक्रिया सहज समजू शकाल. या माहितीचा वापर करून तुमचे खाते ऑनलाइन उघडा आणि डिजिटल बँकिंगच्या सुविधा अनुभवा!